Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशराम मंदिर भूमिपूजनावर न्यायालयाचा हा निर्णय

राम मंदिर भूमिपूजनावर न्यायालयाचा हा निर्णय

अलाहाबाद :

अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन राेखण्याची दाखल करण्यात आलेली याचिका उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली. साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे अाता भूमिपूजनाचा मार्ग माेकळा झाला अाहे.

- Advertisement -

दिल्लीतील पत्रकार साकेत गोखले यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली हाेती. त्यात राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-२ च्या गाईडलाईनचं उल्लंघन असल्याचा दावा करत भूमिपूजन राेखण्याची मागणी केली हाेती. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तीनपेक्षा जास्त लोकं एकत्र येतील, त्यामुळे नियमांचे उल्लंघन होईल, असे नमूद केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या