Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे बंधूंसह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर

ठाकरे बंधूंसह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर

मुंबई l Mumbai

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज (२३ जानेवारी) होणार आहे.

- Advertisement -

या पुतळ्याचे लोकापर्ण आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आजच्या कार्यक्रमाविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या