अमळनेर स्थानकावरील घटना,प्रशासनाचे सहकार्य,मातेसह बाळ सुखरूप
अमळनेर –
सुरत मालदा या रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याने एक महिला गाडीच्या स्वच्छता गृहातच प्रसूत झाल्याची घटना काल दि 23 रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर घडली.
रेल्वे प्रशासनाने त्वरित तत्परता दाखवीत रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण बडगुजर यांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले.सदर महिलेने एका बलिकेस जन्म दिला असून मातेसह बाळ अमळनेर ग्रामिण रुग्णालयात सुखरुप आहेत,ही महिला मालदा येथील असून गाडी सुरत मालदा एक्सप्रेस ने ती कुटुंबियांसह सुरत येथून मालदा येथे जात होती,सात महिन्यांची ती गरोदर असताना अमळनेर स्थानकाजवळ तिला अचानक वेदना सुरू झाल्याने ती स्वच्छता गृहात गेली तेथेच ती प्रसूत होऊन बलिकेस तिन्हे जन्म दिला.
या माहिती रेल्वे प्रशासनास मिळताच रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण बडगुजर,तसेच डीएसआर रजनेश कुमार,अजय डी यासह कर्मचारी त्वरित सदर स्थळी गाडीत दाखल झाले,डॉ बडगुजर यांनी महिलेस धीर देत पुढील उपचार केले,यानंतर महिलेस अमळनेर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान सदर महिला मुदत पूर्व प्रसूत झाल्याने बालिकेचे वजन अवघे एक किलो आहे,यामुळे तिला धुळे येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून महिला मात्र सुखरूप आहे.रेल्वे प्रशासणाच्या या तत्परतेचे प्रवाशांमध्ये कौतुक होत आहे.