Friday, May 3, 2024
Homeनाशिकपोलिसांची टवाळखोरांवर कारवाई

पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

पोलीस आयुक्त दीपक पांडे ( Police Commissioner Deepak Pandey ), उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांच्या आदेशावरून अंबड पोलीस ठाण्याच्या( Ambad Police Station ) हद्दीतील टवाळखोरांवर आजपासून दंडूक्याचा प्रसाद देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चौकाचौकात काही टवाळखोर बसून धूम्रपान करण्याबरोबरच मुलींची व महिलांची छेडछाड करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार टवाळखोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये टवाळखोरांना थेट दंडुक्याच्या प्रसाद देण्यात येत आहे.ही कारवाई नवीन नाशकातील New Nashik विविध ठिकाणी दररोजच करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर,सपोनी निलेश राजपूत, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, पोलीस नाईक नवनाथ काकड, विजय पगारे, जनार्धन ढाकणे, जितेंद्र वझीरे, प्रशांत नागरे, अशोक आव्हाड, सुचित सोळुंके,भारती बूटे, रोहिणी उगले, आदींनी यशस्वीरित्या राबवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या