Wednesday, January 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअंबड मध्ये थेट पोलीस आयुक्तांना चॅलेंज; तलवारी, कोयत्यांसह टोळक्याचा हैदोस; गाड्यांची केली...

अंबड मध्ये थेट पोलीस आयुक्तांना चॅलेंज; तलवारी, कोयत्यांसह टोळक्याचा हैदोस; गाड्यांची केली तोडफोड

कायद्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार

नवीन नाशिक | प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारचा दिवस हा कायद्याच्या बाले किल्ल्याला छेद करणारा ठरला. चारचाकी गाडीत आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने हातात तलवार, कोयता घेत घुडगुस घालुन गाड्यांची तोडफोड केली.

- Advertisement -

त्रिमूर्ती चौकातील अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री नऊ वाजता दरम्यान एक चार चाकी आली. त्या गाडीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने मागच्या मोकळ्या बाजूला दहा ते बारा जण झोपून इशाराची वाट बघत होते. या टोळक्याला कुणालातरी लक्ष करायचे होते मात्र संबंधित व्यक्ती न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करत परिसरात हैदोस घातला. यावेळी परिसरातील महिला व पुरुष घाबरून सैरावैरा पळू लागले.

YouTube video player

दरम्यान एक महिला घरात पळाली व त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले मात्र त्याच दरम्यान गरम भाजीच्या पातेल्याला पाय लागल्यामुळे ते पातेले एका दोन वर्षीय मुलीच्या अंगावर उडाल्याने ती चिमुकली भाजली गेली. यानंतर सदरहू टोळक्याने या ठिकाणाहून निघत कामटवाडे गाव गाठले.

नवीन नाशिक मधील येथील कमल नगर, सावन रोहाऊस परिसरात रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्राने २ ते ३ गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. दरम्यान अंबड पोलिसांनी दोनही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला असून संशय त्यांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Kopargav : कोपरगाव हादरवणारी मोद्दा मंजुळ टोळी अखेर हद्दपार

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav कोपरगाव शहरात गेल्या चार वर्षांपासून शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणार्‍या आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पोलीस प्रशासनाने हद्दपारीची मोठी...