Friday, May 3, 2024
Homeनगर.. तर अंबालिका कारखाना सुरू होऊ देणार नाही

.. तर अंबालिका कारखाना सुरू होऊ देणार नाही

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अंबालिका साखर कारखान्याने (Ambalika Sugar Factory) सभासद असलेल्या कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाला प्राधान्य द्यावे, वाहनांचे करार कर्जत तालुक्यातीलच करावेत, एफआरपी एकरकमी द्यावी या मागण्यांचा विचार केला नाही. तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास आगामी गळीत हंगामात (crushing season) अंबालिका साखर कारखाना (Ambalika Sugar Factory) सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

अंबालिका साखर कारखाना (Ambalika Sugar Factory) गळीत हंगाम (crushing season) सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील सभासद शेतकर्‍यांच्या उसाची तोड न करता बाहेरील उसाला प्राधान्य देतात, यामुळे कर्जत (Karjat) तालुक्यातील ऊस तसाच शिल्लक राहतो, यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढतो, उसाचे वजन घटते, ऊस तोडीसाठी चकरा माराव्या लागतात, यामुळे पुढील गळीत हंगामात कर्जत तालुक्यातील उसाची तोड प्रथम करावी, ऊस वाहतुकीसाठी जे वाहनांचे करार केले जाणार आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील वाहन चालकांना प्राधान्य देण्यात यावे, बाहेरच्या वाहनांना कर्जत तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही.

कारखान्यांनी एफआरपीचे (FRP) तुकडे करण्याचा घाट घातला असून त्याविरोधात राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) तीव्र आंदोलन (Movement) छेडणार आहे. ऊस उत्पादकांची 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 मिस्डकॉल मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या