Friday, May 3, 2024
Homeनगरराष्ट्रवादीची सावेडीला पसंती, भाजपचा कथ्याकूट सुरूच

राष्ट्रवादीची सावेडीला पसंती, भाजपचा कथ्याकूट सुरूच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी शिवसेनेने जुनीच नावे दिली असून राष्ट्रवादीने एक व्यावसायिक तर दुसरा सावेडी उपनगरातील नाव सुचविलेअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान भाजपात जुन्या रामदास आंधळे यांच्या नावाची चर्चा असून कथ्थ्याकूट अजूनही सुरूच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महापालिका सभागृहात पाच स्वीकृत सदस्यांची निवड उद्या गुरूवारी होत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना प्रत्येकी दोन तर भाजकडून एक स्वीकृत नियुक्त केला जाणार आहे. गटनेत्यांनी आयुक्तांकडे शिफारस करण्याचा आज बुधवार शेवटचा दिवस आहे.

दुपारपर्यंत शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी बंद पाकिट आयुक्तांना सादर केले. त्यात संग्राम शेळके आणि मदन आढाव या दोघांची नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गतवेळी हीच दोन नावे शिवसेनेने दिली होती. तीच नावे पुन्हा देण्यात आली.

भाजपकडून रामदास आंधळे यांचे नाव निश्चित झाले आहे. गतवेळीही तेच नाव होते. मात्र हे नाव बदलासाठी माजी खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे आणि शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी आंधळे यांच्या नावाला पसंती दिली आहे.

गटातटाच्या राजकारणात भाजपात दुपारपर्यंत कथ्थ्याकूट सुरूच होता, पण आंधळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

वतनदार वकील ?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गतवेळी दिलेले विपुल शेटिया यांचेच नाव पुन्हा देण्यात आले असून दुसरे नाव हे नागापूर-बोल्हेगाव परिसरातील असल्याचे समजते. एका वकिलाला राष्ट्रवादीने पसंती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. हे वकिल बोल्हेगावचे वतनदार आहेत. हेच नाव बंद पाकिटात देण्यात आले असून त्याचा सस्पेंस मात्र राष्ट्रवादीकडून कायम ठेवण्यात आला आहे. मात्र सावेडी उपनगरात असलेल्या सात वार्डातील एक सामाजिक कार्यकर्ता इतकीच माहिती गटनेते संपत बारस्कर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या