Wednesday, March 26, 2025
HomeनगरAMC : 16 हजार 722 मालमत्ताधारकांनी घेतला शास्ती माफीचा लाभ

AMC : 16 हजार 722 मालमत्ताधारकांनी घेतला शास्ती माफीचा लाभ

सवलतीसाठी अखेरचे सात दिवस || सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेने जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील 16 हजार 722 मालमत्ता धारकांनी 8 कोटी 88 लाखांची सवलत घेऊन 17 कोटी 16 लाखांचा कर जमा केला आहे. शास्तीमध्ये 50 टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी वसुली कार्यालये व भरणा केंद्र 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेने 8 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत 100 टक्के शास्ती माफ केली होती. तर, 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत 75 टक्के सवलत देण्यात आली होती. मार्च अखेरपर्यंत शास्तीमध्ये 50 टक्के सवलत दिली जात आहे. सवलत काळात थकबाकीदार करदात्यांनी 8 कोटी 88 लाखांची सवलत घेऊन 17 कोटी 16 लाखांचा कर जमा केला आहे. त्यामुळे एकूण थकबाकीपैकी 26 कोटी सात लाखांची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे 77 कोटींची वसुली झाली आहे. अखेरच्या सात दिवसांत अधिकाधिक वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना अद्यापही 50 टक्के सवलत घेण्याची संधी आहे.

ही अखेरची संधी असून यानंतर शास्तीमध्ये सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कर भरावा. नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. कर न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत डांगे यांनी वसुली विभागाला कर वसुलीसाठी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांपर्यंत जाऊन त्यांना सवलतीचा लाभ देऊन कर वसूल करावा, कर न भरल्यास कारवाई करावी, असे आदेश डांगे यांनी दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिक्षणाच्या बदलत्या वाटा : शैक्षणिक कामकाज, वेळापत्रक होणार काटेकोर

0
संगमनेर | Sangamner| संदीप वाकचौरे राज्य अभ्यासक्रम आराखड्या संदर्भाने राज्याच्या शैक्षणिक कामकाजाचे दिवस आणि शालेय वेळापत्रक संदर्भाने महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये...