Monday, July 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAmit Shah : "…तर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा"; अमित शाहांचा शरद...

Amit Shah : “…तर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा”; अमित शाहांचा शरद पवारांना सवाल

अमरावती | Amravati

- Advertisement -

देशात सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरु असल्याने सगळ्याच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा होत आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडत आहेत.

अशातच आज अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana)यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेतून बोलताना शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यसह कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने अमरावतीकरांची माफी मागितली. मात्र, तुम्ही दहा वर्ष कृषीमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुमच्या कार्यकाळात विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या (Suicide) केल्या आहेत, अगोदर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असं अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले.

पुढे बोलताना शाह म्हणाले की, ज्यावेळी मी संसदेत कलम ३७० रद्द करण्यासाठी विधेयक मांडत होतो त्यावेळी मला राहुल गांधी म्हणाले की कलम ३७० हटवू नका. तेव्हा मी त्यांना विचारलं का तर ते म्हणाले, असं केल्यास रक्तपात होऊ शकतो. मात्र, आज पाच वर्षे झाली असून काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. दगडफेक करण्याचे कोणीही धाडस केलेले नाही. आम्हाला ४०० जागा मिळवून संविधान बदलायचं आहे असा अपप्रचार काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. आम्हाला असं करायचं असतं तर २०१४ पासून आमच्याकडे पूर्ण बहूमत आहे, तेव्हाच केलं असतं. मात्र, आम्ही याचा उपयोग करत कलम ३७० हटवणं, ट्रिपल तलाकला बंदी असे निर्णय घेतले, असे अमित शाह यांनी म्हटले.

तसेच अमरावतीमध्ये (Amravati) उमेश कोल्हे यांची हत्या झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे संस्कार सोडले. आता आमचे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे संस्कार घेऊन पुढे जात आहेत आणि आमचं सरकार बनलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात (Maharashtra)कोणत्याही उमेश कोल्हेची हत्या होणार नाही, असंही अमित शाह यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या