Sunday, November 24, 2024
HomeराजकीयAmit Thackeray : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ''तेव्हा...

Amit Thackeray : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ”तेव्हा माझ्या पोटात…”

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत माहीम मतदारसंघातून (Mahim Constituency) अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी पक्षाच्या ४५ उमेदवारांची यादी (List) जाहीर केली. यानंतर आता उमेदवारी जाहीर झाल्यावर आज अमित ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

यावेळी बोलतांना अमित ठाकरे म्हणाले की, “यादीत माझे नाव आले तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता. कारण मला समजलं की आता माझ्या आयुष्यात बदल होणार आहे. जस मी आधी वावरायचो आता तस वावरता येणार नाही.आता शासकीय पदाचे ओझं राहणार आहे. पण ते ओझं पेलायला मी तयार आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले. तसेच निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास आहे. दादरमध्ये (Dadar) मी लहानाचा मोठा झालो असून आमच्या याठिकाणी तीन पिढ्या राहिल्या आहेत. दोन्ही उमेदवार समोर असतील, त्यांना माझ्या शुभेच्छा”, असेही अमित ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

तसेच “राज ठाकरेंकडे मी कधीही मतदारसंघाचा आग्रह केला नाही. मी स्वत:त्यांना सांगितलं, माझ्यासाठी १० जागा कॉम्प्रमाईज झाल्या नाही पाहिजे. कुणासोबतही बोलू नका. राज ठाकरे मला नेहमी सांगतात हे राजकारण आहे. समोरचे कसे आहेत हे ओळखता आले पाहिजे. तुमचं राजकारण (Political) तुम्ही करा, आमचं राजकारण आम्ही करु. मी एकटं उभं राहून लढून काय फायदा?, राज ठाकरेंनी सांगितले, स्वबळावर म्हणजे स्वबळावर, पक्षाला गरज होती म्हणून मी निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला.मी माहीमकरांच्या प्रश्नासाठी एक दिवस देणार”, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

दरम्यान, २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतून (Worli) पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्या विरोधात उमदेवार दिला नव्हता. मात्र, आता अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना, दादर माहीममधून उमेदवार देणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. याबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, वरळीत गेल्यावेळी उमेदवार न देणं ही राज साहेबांची शिकवण, त्यांचे संस्कार, मी समोरच्यांकडून अपेक्षा नाही करु शकत. मी त्यांची शिकवण घेतो. समोरच्यांकडून काय येईल हे माहिती नाही, असे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या