Wednesday, July 24, 2024
Homeमनोरंजनदीड कोटी पगार असलेल्या अमिताभच्या बॉडीगार्डची बदली

दीड कोटी पगार असलेल्या अमिताभच्या बॉडीगार्डची बदली

मुंबई

- Advertisement -

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचे बॉडीगार्ड (Bodyguard)असलेले जितेंद्र शिंदे नुकतेच त्यांना मिळत असलेल्या पगारामुळे (salary)चर्चेत आले होते. मुंबई पोलिस (mumbai police)दलात हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची बदली झाली आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (hemant nagrale)यांनी त्यांची बदली केली आहे. अमिताभ बच्चन जितेंद्रला वार्षिक १.५ कोटी रुपये देत होते असा आरोप आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्रच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

एकनाथ खडसेंवर ED ची मोठी कारवाई

जितेंद्र शिंदे यांना आता मुंबई पोलिस दलात बोलवून घेतले आहे. २०१५ पासून अमिताभ यांच्यासाठी ते काम करत होते. ते स्वतःची खासगी सुरक्षा एजन्सी देखील चालवत होते. ही सुरक्षा एजन्सी पत्नीच्या नावावर असल्याचे जितेंद्र शिंदे यांनी सांगितले. हे प्रकरण आता आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. मुंबई पोलिस या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. शिंदे यांनी अमिताभ बच्चनकडून १.५ कोटी पगार मिळत असल्याचे वृत्त नाकारले आहे.

४ वर्षांपेक्षा जास्त काळ एका पोलीस ठाण्यात

मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करता येणार नाही असे फर्मान काढले होते. विभागाचे म्हणणे आहे की, या नियमांतर्गत शिंदे यांची डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. अमिताभ बच्चन यांच्या लेखा विभागाकडूनही देयक भरण्याबाबत माहिती मागितली जाऊ शकते.

जितेंद्र १.५ कोटी रुपये घेत

शिंदे नेहमी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीसारखे दिसत होते. काही काळापूर्वी अचानक त्यांच्या पगाराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. जितेंद्र १.५ कोटी रुपये घेत आहे. मात्र, एवढे पैसे घेण्यामागचे कारण असे होते की त्यांनी बच्चन कुटुंबाला आपली वैयक्तिक सुरक्षाही दिली. सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड यांना भारतात आल्यावर शिंदे यांनी सुरक्षा पुरवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या