Sunday, May 19, 2024
Homeनगर17 हजार 683 कुटूंबांना 132 दिवसात हक्काचा निवारा

17 हजार 683 कुटूंबांना 132 दिवसात हक्काचा निवारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अमृत महाआवास अभियान 31 मार्चपर्यंत नगर जिल्ह्याला राज्यात पंतप्रधान घरकुल योजना आणि राज्य पुरस्कृत योजनेत घरकुल बांधणीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. जिल्ह्यात गेल्या 132 दिवसात पंतप्रधान घरकुल योजनेत 13 हजार 294 व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये 4 हजार 389 घरकुलांची बांधणी पूर्ण झाली असून अशा प्रकारे 17 हजार 683 लाभार्थी कुटूंबांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळाला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या उपस्थित 20 नोव्हेंबर 2022 पासून अमृत महाआवास अभियानला सुरूवात झाली. दरम्यान, अभियान सुरू असतांना क्षीरसागर यांची बदली झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या अभियानात रस दाखवत, रात्रंदिन, गाव ते तालुका आणि तालुका ते जिल्हा परिषद पातळीवर दर आठवड्याला या अभियानाचा पाठपुरावा केला. यामुळे अभियानांची गती कमी झाली नाही.

या कामात त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व गट विकास अधिकारी, गाव पातळीवर काम करणारे ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक, ग्रामरोजगार यांची मोलाची साथ मिळाली. यामुळे राज्यात अभियान काळात 132 दिवसात नगर जिल्ह्यात 17 हजार 683 लाभार्थीना घरकुल बांधून देता आली. या अभियानात प्रधानमंत्री घरकुल योजनेत संख्येनुसार जामखेड, अकोले आणि कर्जत तालुक्यांनी व राज्य पुरस्कृत योजनेत कर्जत, नेवासा आणि जामखेड या तालुक्यांनी उल्लेखनीय काम केले.

अभियान काळात साकारलेली घरकुले

अकोले 1 हजार 879, जामखेड 2 हजार 140, कर्जत 1 हजार 179, कोपरगाव 944, नगर 739, नेवासा 2 हजार 35, पारनेर 573, पाथर्डी 1 हजार 491, राहाता 867, राहुरी 771, संगमनेर 1 हजार 427, शेवगाव 1 हजार 156, श्रीगोंदा 835 आणि श्रीरामपूर 647 अशी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या