Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअमृता फडणवीस यांची NCP नेत्या विद्या चव्हाणांना मानहानीची नोटीस; नेमकं काय आहे...

अमृता फडणवीस यांची NCP नेत्या विद्या चव्हाणांना मानहानीची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

भाजपच्या आयटीसेल (bjp it cell) प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर (rashmi thackeray)केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृता यांनी त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली.

- Advertisement -

तसेच अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या सुनेच्या प्रकरणाचा संदर्भ देत विद्याहीन म्हणत मानहानीची नोटीस पाठविली आहे. तसेच, अमृता यांनी ट्विट करून आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,ती आहे नेता विद्याहीन चव्हाण अशी टीका केली आहे. अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिपणी करणाऱ्या जितेन गजारिया ( Police Action Against Jiten Gajaria ) यांच्यावर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत अमृता फडणीस यांना त्या वादात ओढले होतं. विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या कि, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर तसेच भाजपवर निशाणा साधला होता.

काय म्हटलंय नोटिसीमध्ये?

या नोटिसीमध्ये अमृता फडणीस यांच्या वकिलांनी असे म्हटले आहे की, विद्या चव्हाण यांच्या विधानामुळे आमच्या अशिलाची बदनामी करण्यात आली आहे. तिच्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचली आहे. तथापि असं असूनही तुम्ही उपरोक्त बदनामीकारक विधान चुकीच्या हेतूने आणि आमच्या अशिलाच्या बदनामीच्या उद्देशाने केले आहे. या कारणास्तव त्यांना प्रचंड वेदना, मानसिक वेदना आणि लाजिरवाणे वाटले आहे. त्याबाबत त्यांची बदनामी झाली असून, आमचा अशिल म्हणतो की या अगोदर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बेजबाबदार आणि बदनामीकारक विधाने केली आहेत. ती खोटी व दिशाभूल करणारी होती. यासाठी ही सूचना मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत तुम्ही केलेली उपरोक्त बदनामीकारक विधाने निराधार, आहेत आणि बिनशर्त मागे घेतली आहेत असे सांगून पत्रकार परिषद घेऊन आमच्या अशिल ची बिनशर्त माफी मागावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या