Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखासगी शिकवणी बाबत अधिनियम तयार करणार- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

खासगी शिकवणी बाबत अधिनियम तयार करणार- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

काही महाविद्यालये थेट खासगी शिकवणी वर्गांशी करार करून शिक्षण व्यवस्थेचा गैरवापर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खासगी शिकवणी अधिनियम तयार करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावेळी बोलताना भुसे म्हणाले, या अधिनियमाचा मसुदा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून संबंधित नियमावलीची आखणी देखील सुरू आहे. या अधिनियमाच्या मसुद्याबाबत सदस्यांकडून सकारात्मक सूचना आल्यास सुचवलेल्या मुद्द्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...