Friday, May 3, 2024
Homeजळगावराममंदिराच्या नावावर पैसे वसुल करणार्‍या प्रौढाला पकडले

राममंदिराच्या नावावर पैसे वसुल करणार्‍या प्रौढाला पकडले

जळगाव : Jalgaon

शहरासह जिल्ह्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन सुरु आहे. याचीच संधी साधून बनावट पावती पुस्तक छापून वसूल करणार्‍या एकाला आज गोलाणी मार्केटमध्ये पकडण्यात येवून त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisement -

राजेंद्र भास्करराव सोनवणे (४७, रा.चाळीसगाव घाट) असे संबंधिताचे नाव असून त्याच्या विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राजेंद्र कांतीलाल लोहार हे आज कामानिमित्ताने भास्कर मार्केट येथे आले होेते. दुपारी २ वाजून ५५ मिनिटांच्य सुमारास राजेंद्र लोहार यांना त्यांचे मित्र सुरेश लुल्ला यांचा फोन आला. त्यांनी एक व्यक्ती श्रीराम मंदिरासाठी देणगी स्वरुपात पावत्या फाडत असल्याची माहिती लोहार यांना दिली. त्यानुसार लोहार हे व त्यांच्या सोबत असलेले राजेंद्र देवीदास नन्नवरे व देवेंद्र दुर्गादास भावसार यांच्यासोबत गोलाणी मार्केट गाठले.

विश्‍व परिषदेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी

गोलाणी मार्केटमधील विजय इलेक्ट्रीक येथे राममंदिराच्या नावे वसुली करणार्‍या तरुणाची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव राजेश सोनवणे असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ साईचैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषद द्वारा संचलित जळगाव या नावाने पावती पुस्तक आढळून आले. पुस्तकावर १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२१ विधी समर्पण अभियान असा उल्लेख छापण्यात आलेला असल्याचेही दिसून आले. पुस्तकात ४०० रुपये, ५० रुपये व १० रुपये याप्रमाणे पाच पावत्या फाडलेल्या होत्या.

पदाधिकार्‍यांनी विचारले असता, तो विश्‍व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत होता. प्रत्यक्षात लोहार यांच्यासह त्यांच्या सोबतच्या पदाधिकार्‍यांनी चौकशी केली असता, तो विश्‍व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता नसल्याचे समोर आले. राममंंदिराच्या नावावर स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वसुली करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पदाधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेत, जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी राकेश कांतीलाल लोहार यांच्या फिर्यादीवरुन राममंदिराच्या नावे पैसे वसुल करणार्‍या राजेंद्र भास्करराव सोनवणे याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या