Friday, May 3, 2024
Homeजळगावआठ वर्षीय कन्या लग्नाला आली अन् जिव गमावून बसली

आठ वर्षीय कन्या लग्नाला आली अन् जिव गमावून बसली

वरणगाव फॅक्टरी, (Varangaon factory) ता.भुसावळ ( वार्ताहर ) –

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतील सार्वजनिक बौद्ध विहारात लग्नासाठी नवरदेवाची लगबग सुरु असतानाच आठ वर्षाच्या चिमुरडी झोका खेळत असतांना अचानक लोखंडी खांब तुटून डोक्यावर पडल्याने चिमुरडीचा जागीच करुण अंत झाल्याची अत्यंत दुदैवी घटना सोमवारी घडली.

- Advertisement -

आयुध निमाणी वसाहत परिसरा शेजारील सुशील नगर (Sushil nagar) भागातील रहिवाशी बाळू पांडूरंग इंगळे यांच्या मुलीचे लग्न सोमवार, दि.१६ रोजी होते. त्या निमित्ताने वर्‍हाडी मंडळी बौद्ध विहारात थांबलेले होते. दुपारच्या वेळी लग्न लागण्याची वेळ जवळ येत असल्याने सर्व मंडळी घाई गडबडीत होते. तर मामाच्या घरी लग्नासाठी भुसावळ (bhusawal) येथून आलेली समीक्षा अरुण सावळे ही आठ वर्षाच्या चिमुरडी ही बौद्ध विहारात आलेली होती.

तेथील झोके पाहुन मात्र तिला झोका खेळण्याचा मोह आवरला गेला नाही, ती सरळ लोखंडी झोक्यात जावून बसली आणि अचानक झोका कोलमडून खाली कोसळून समिक्षाच्या डोक्यावर आदळला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी निर्माणीच्या मुख्य रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी भुसावळ (bhusawal) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाल्याने लग्न घरी शोककळा पसरली.

निर्माणी प्रशासनावर हलगर्जी पणाचा आरोप – आयुध निर्माणी वसाहतील या ठिकाणची देखभाल दुरुस्तीचे काम निर्माणी प्रशासनच करीत असते. परंतु संबधित विभाग अथवा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे, मात्र नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या