Thursday, May 9, 2024
Homeजळगावरस्त्याने जाणार्‍या महिलेकडे वयोवृद्धाची शरीरसुखाची मागणी

रस्त्याने जाणार्‍या महिलेकडे वयोवृद्धाची शरीरसुखाची मागणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रस्त्याने (road) जात असलेल्या महिलेला (woman) अडवून (blocking) तिच्याकडे शरिरसुखाची (Demand for physical pleasure) मागणी केली. त्याला विवाहितेने विरोध (opposed) केला असता वृद्धाने (old man) महिलेला जीवेठार (Death threats) मारण्याची धमकी देत तिच्यासोबत अंगलट करुन विनयभंग (molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वृद्धावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील एका परिसरात 42 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बळीराम पेठ परिसरात राहणारा विजय विनायक काळकर (वय-61) या वृद्धाने महिलेला दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास महिला घरी जात असतांना तिचा रस्ता अडवून तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली.

तसेच महिलेची ओढणी ओढत तिचा विनयभंग केला आणि शिवीगाळ करुन तू जर नकार दिला तर याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. यावेळी इतर नागरीकांना पाहून संशयित पसार झाला होता.

दरम्यान, भेदरलेल्या अवस्थेत महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित विजय विनायक काळकर या वृद्धावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या