Sunday, May 19, 2024
Homeजळगावदुचाकीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना शहरातील बालाजी नगर जवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथील् कमलाकर काशीराम जंगले (वय-६२) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच.१५ ए.एफ. ८७५८) मालेगाव कडून चाळीसगावाकडे येत असताना भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कमलाकर काशीराम जंगले हे जागीच यांची जागीच मृत्यू झाला.

हि घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मालेगाव – चाळीसगाव रोडवरील बालाजी नगराजवळ घडली. घटना घडताच अज्ञात वाहन धारक हा पसार झाला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मयताचा मुलगा राकेश कमलाकर जंगले यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम- ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४,१३४(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास मुकेश पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या