Sunday, May 5, 2024
Homeनगरआनंदाच्या शिधाचे जिल्ह्यात 100 टक्के वाटप

आनंदाच्या शिधाचे जिल्ह्यात 100 टक्के वाटप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सर्वसामान्य कुटुंबाची दिवाळी गोड व आनंददायी व्हावी, यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. जिल्ह्यातील 1 हजार 884 स्वस्त धान्य दुकानात 100 टक्के आनंदाचा शिधा वाटप पूर्ण केले असल्याची माहिती सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात एकूण 1 हजार 884 स्वस्त धान्य दुकाने आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 6 लाख 79 हजार्र 540 आनंदाचा शिधा पिशव्याची वाटप करण्यात आली. तर दुसर्‍या टप्प्यात 6 लाख 72 हजार 861 पिशव्यांचे असा 100 टक्के जिल्ह्यात वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. गॅस, जीवनावश्यक वस्तूंची वाढती भाववाढ यामुळे गोरगरीब मेटाकुटीला आले आहेत.

रोजचे जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत तरी मुला-बाळांच्या मुखात दोन गोड घास घालावेत, यासाठी सर्व जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते सदैव खटाटोप करत असतात. यंदा राज्य सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी, याहेतूने त्यांना दिवाळीपूर्वी हा आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले. परंतू या शिधाचे वाटप दिवाळी पूर्वी होणे गरजेचे होते. आनंदाच्या शिधामध्ये रवा, साखर, चनाडाळ, पामतेल असे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात रवा 6 लाख 92 हजार 152 किलो, तर साखर 6 लाख 92 हजार 763 तर चनाडाळ 6 लाख 91 हजार 711 तर पामतेल 6 लाख 79 हजार 540 पिशव्याचे वाटप करण्यात आले.

तालुकानिहाय लाभ

नगर 48 हजार 521, नेवासा 54 हजार 765, श्रीगोंदा 50 हजार 574, पारनेर 48 हजार 655, पाथर्डी 40 हजार 945, शेवगाव 45 हजार 250, संगमनेर 68 हजार 765, अकोले 41 हजार 831, श्रीरामपूर 37 हजार 284, राहुरी 52 हजार 452, कर्जत 37 हजार 828, जामखेड 31 हजार 2, राहाता 5 हजार 39, कोपरगाव 44 हजार 68, नगर शहर 30 हजार 561 एकून 6 लाख 79 हजार 540.

राज्य शासनाकडून नागरिकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. मात्र, हे भेट दिवाळी पूर्वीच वाटप होणे अपेक्षित होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या दिवशीच स्वस्त धान्य दुकानाबाहेर उभे राहावे लागले, अशा तक्रारी नागरिकांमधून होत होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या