Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र"नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून..."; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

“नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांत दोन गटांत वाद झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमणावर पोलीस फौजफाटा तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे आज या दोन्ही जिल्ह्यांत शांतता पाहायला मिळत असून सर्व सुरळीतपणे चालू आहे. अशातच आता कालच्या या दोन्ही जिल्ह्यांत घडलेल्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना भाष्य करत सरकारव गंभीर आरोप केला आहे.

यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी असे सांगितले होते की, सध्याचे जे महायुती, भाजपचे सरकार आहे ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर केव्हाही दंगली घडवू शकतात. त्याचप्रमाणे राज्यात काल छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नाशिक (Nashik) व अन्य ठिकाणी ज्या काही घटना झाल्या, त्या कटकारस्थान करून दंगली घडवण्याचे प्रयत्न आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : संपादकीय : १७ ऑगस्ट २०२४ – कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा

पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, या घटनांमुळे राज्यात कायदा (Law) सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्यात अशा घटना घडू नयेत, राज्यात सलोखा आणि एकसंघ राष्ट्र रहावे, ही गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळ्या घटनांकडे सरकारने (Government) जातीने लक्ष दिले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

तसेच निवडणूक आयोगाने (Election Commission) काल विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. खऱ्या अर्थाने राज्यात देखील सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, आम्हाला ही गोष्ट समजत नाही की भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यासाठी का घाबरतो आहे? निवडणुका जमेल तितक्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भाजप सरकार नगरसेवकांची देखील निवडणूक घेण्यासाठी तयार नाही. आपला मोठा पराभव होईल, या भीतीने भाजप सरकार निवडणूकांसाठी घाबरत आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या