Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही…' - अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची...

‘हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही…’ – अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले., यावर शरद पवार अत्यंत भावूक झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून हा केवळ अपघात असून यात राजकारण आणू नये असे शरद पवार यांनी म्हंटले आहे

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, ‘अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.

मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये, या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...