Sunday, February 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania On Dhananjay Munde : "...तर तुम्हाला आज हे दिवस बघावे...

Anjali Damania On Dhananjay Munde : “…तर तुम्हाला आज हे दिवस बघावे लागले नसते”; मंत्री मुंडेंवर दमानियांचा पलटवार

मुंबई | Mumbai

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्यावर ते कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदी करताना मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळत त्यांना ‘बदनामिया’ असे म्हटले होतं. यानंतर आता पुन्हा एकदा दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना अंजली दमानिया म्हणाल्या की,”तुम्ही जितका वेळ मंत्री म्हणून काढला, जितका वेळ तुम्ही आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत काढला असेल, त्याच्यापेक्षा एक दशांश वेळदेखील तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असता तर तुम्हाला आज हे दिवस बघावे लागले नसते. तुम्ही जे-जे बोलत होता ते कसं खोटं आहे ते सिद्ध करण्यासाठी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत आहे”, असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी अंजली दमानिया यांनी १२ एप्रिल २०१८ चा जीआर देखील वाचून दाखवला.

त्या म्हणाल्या की,”थोड्यावेळापुर्वी धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. जसं सगळेच नेते पत्रकार परिषद घेतात त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंनी देखील घेतली, ज्यात ते थाटात एका खुर्चीवर एक पांढरा टॉवेल पसरवलेला होता आणि अशा थाटात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मला वाटेल ती नावं देखील ठेवली. धनंजय मुंडेंनी मला बदनामिया असे म्हटले होत, पण खरे तर त्यांनी मला पुराविया म्हणायला हवे होते. बदनाम लोकांचे पुरावे देत असताना मला त्यांच्याकडून कोणतेही नाव आले तरी मला चालेलं त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या, मला फरक पडत नाही. त्यांचे एक एक पुरावे बाहेर काढून मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली आहे, असे म्हणत दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले.

तसेच “मंत्री (Minister) म्हणून तुम्ही वेळ दिला असता तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असत्या. पण बीडमध्ये जावून दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी (Land) लाटायची हे सर्व प्रकार जे चालले होते, तुमच्या अगदी मामींची जमीन तुम्ही लाटली. त्याऐवजी मंत्री म्हणून काम केले असते तर या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या”, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या