Sunday, September 15, 2024
Homeनगरन्याय लवकर मिळत नसेल तर एन्काउंटर योग्यच – अण्णा हजारे

न्याय लवकर मिळत नसेल तर एन्काउंटर योग्यच – अण्णा हजारे

अहमदनगर – देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याबाबतचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मिळत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
अण्णा म्हणाले,

- Advertisement -

‘हैदराबादमधील अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नाही. आपल्या देशाची घटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकष विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मिळत नसेल तर अशा पोलीस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल.’

- Advertisment -

ताज्या बातम्या