Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअंनिसतर्फे 'त्या' पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण

अंनिसतर्फे ‘त्या’ पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण

नाशिक । Nashik

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास भवन (Tribal Development Bhawan) संचलित शासकीय कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव (Devgaon) येथील महाराष्ट्रभर (Maharashtra) गाजलेल्या मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध करणाऱ्या प्रकरणाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (annis) कार्यकर्त्यांनी गांभीर्याने दखल घेत आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. याप्रसंगी सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधत विद्यार्थिनींच्या मनातील अंधश्रद्धा जाणून घेतल्या…

- Advertisement -

यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींकडून (Student) चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून घेतले. पीडित विद्यार्थिनीला सन्मानाने विचार मंचावर बसवत तिच्या हस्ते चमत्कार प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच मासिक पाळी (Menstrual cycle) संदर्भात वयात येणाऱ्या विद्यार्थिनींच्या शरीरात नेमके काय बदल होतात, याचे ज्ञान कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनींना समजावून सांगितले.त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील मासिक पाळी संदर्भातील समज व गैरसमज, अंधश्रद्धा (Superstition) भीती दूर होण्यास मोठी मदत झाली. त्याचबरोबर शिक्षकांनाही एकत्र करून त्यांचे प्रबोधन कार्यकर्त्यांनी केले.

तसेच मासिक पाळी आली म्हणून ज्या विद्यार्थिनीला अपवित्र, अशुद्ध मानून, वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध केला होता, त्याच विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून घेतले. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय अधिकारी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. तर पीडित विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त करत म्हटले की, मी स्वतः आता मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही आणि इतर माझ्या मैत्रिणी व विरोध करणाऱ्यांना यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका, असे सांगेन.

दरम्यान, याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे (Principal Secretary Dr. Thaksen Gorane) कृष्णा चांदगुडे (Krishna Chandgude) महेंद्र दातरंगे ,कोमल वर्दे, संजय हरळे ,दिलीप काळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या