Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेश51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून भारतीय पॅनोरमाची यादी जाहीर

51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून भारतीय पॅनोरमाची यादी जाहीर

दिल्ली । Delhi

- Advertisement -

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी गोव्यात (Goa) पार पडणारा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव येत्या 16-21 डिसेंबर दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आयोजित केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने 2020 साठी इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची घोषणा केली आहे. गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या 8 दिवसांच्या चित्रपट महोत्सवात नोंदणीकृत मान्यवर आणि निवड झालेल्या चित्रपटांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवड झालेले चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येतील.

समकालीन 183 भारतीय चित्रपटांमधून निवडलेले हे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीची उत्फुल्लता आणि विविधता यांचे प्रतिबिंब दर्शवतात. फीचर आणि नॉन फीचर या दोन्ही विभागात ज्युरी पॅनेलने आपापल्या तज्ञ मतानुसार भारतीय पॅनोरमातील चित्रपटांची निवड करण्यासाठी योगदान दिले. या फीचर फिल्मसाठी असलेल्या बारा मान्यवरांच्या निवड समितीच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम चित्रपटनिर्माते,पटकथालेखक आणि निर्माते जॉन मॅथ्यु मथ्थन होते. इतर मान्यवरांमध्ये वैविध्यपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विविध चित्रपट, चित्रपट मंडळे आणि चित्रपट व्यवसायातील प्रख्यात व्यक्ती यांचा समावेश आहे.

इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म श्रेणीत निवड समितीने 20 चित्रपटांची निवड केली. भारतीय पॅनोरमा 2020 चा शुभारंभाचा चित्रपट म्हणून तुषार हिरानंदानी दिग्दर्शित यांच्या ‘सांड की आँख’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली आहे. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 च्या इंडियन पॅनोरमा विभागात मुख्य प्रवाहातल्या इतर 3 चित्रपटांचीही निवड फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गील्डच्या शिफारसीवरून डीएफएफ च्या आंतर समितीतर्फे झाली आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात सामाजिक जाणीवांनी समृद्ध व सौंदर्यदृष्ट्या उत्कृष्ट असणाऱ्या चित्रपटाची निवड, भारतीय चित्रपटसृष्टीच्या नॉन-फीचर विभागाशी संलग्न असणाऱ्या निवड समितीच्या प्रख्यात सभासदांनी केली आहे. 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने इंडियन पॅनोरमा अंतर्गत निवडलेले नॉन-फीचर चित्रपट गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या कालावधीत दाखवण्यात येतील.

समकालीन 143 भारतीय नॉन-फीचर चित्रपटांमधून निवडलेले चित्रपट हे आपल्या चित्रपट निर्मात्यांच्या संशोधन, दस्तावेजीकरण, मनोरंजन क्षमतेचे आणि समकालीन भारतीय मूल्यांचे दर्शन घडवतील. या नॉन-फीचर फिल्मसाठी असलेल्या सात सदस्यीय निवडसमितीच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम चित्रपटनिर्माते आणि माहितीपटकार हाओबम पबन कुमार होते. इंडियन पॅनोरमा 2020 मध्ये नॉन-फीचर फिल्मसाठी अंकित कोठारी दिग्दर्शीत ‘पंचिका’ या चित्रपटाची निवड शुभारंभासाठी करण्यात आली आहे.गोव्यात होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलची सांगता आणि निरोप समारंभ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मात्र त्यावेळी अत्यंत मोजक्याच जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

23 फीचर आणि 20 नॉनफीचर चित्रपटांची संपूर्ण यादी

गोव्यात होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलची सांगता आणि निरोप समारंभ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मात्र त्यावेळी अत्यंत मोजक्याच जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या