पुरुष – समस्त कर्क राशि पुरुषांना नवीन वर्ष सुख-समाधानाचे असणार आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असाल त्या कार्यक्षेत्रात आपण पूर्णपणे यशस्वी होणार आहात. आपणास यावर्षी मोठी कार्य करावयाची आहेत आणि ही कार्यसिद्धता आपणास प्राप्त होणार आहे. आपले हाती कार्याची सुत्रे असल्यामुळे आपण हवे तसे बदल आपले कार्यक्षेत्रात करु शकणार आहात. मुलांचेबाबतीत कार्य पूर्ण करणार आहात. घरातील वृद्धजणांची आरोग्यविषयक फार काळजी घ्यावी लागणार आहे. कौटुंबीक वादाची शक्यता आहे.
महिला – नविन संपूर्ण वर्ष सांसारिक हवी तशी सुखे प्राप्त होणार आहेत. आपणास माहेरी जाण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. माहेरची मंडळीची वर्दळ आपले सासरी असणार आहे. यांचेमार्फत एखादे मंगलकार्यदेखील संपन्न होणार आहे. मुला-मुलींचे विवाहदेखील ठरणारे आहेत. पती-पत्नी वाद असतील व कोर्टात केसेस चालू असतील तर याबाबत हे वर्ष समझोता करणेस अतीउत्तम आहे. पुनरुपी आपण सुखाचा संसार करु शकणार आहात. विवाह झालेले नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा सर्वांचे विवाह या वर्षात ठरतील.
नोकरवर्ग – फारच सुंदर असे हे वर्ष आहे. आपण या वर्षात ज्या संधी लाभणार आहे त्याचा उपयोग आपण किती घेणार आहात? यावर सर्व अवलंबून असणार आहे. आपणाकडून नातेसंबधांच्या काही अपेक्षा असतील त्या पण आपण पूर्ण करणार आहात. नवीन कार्याच्या संधी प्राप्त होतील. हवी त्याठिकाणी बदली, त्यात पगारवाढ पण होणार आहे. नवीन नातेसंबंध तयार होणार आहेत. ज्यांच्या परदेशवारीच्या संधीत अडथळे आले होते ते अडथळे आता दूर होतील. नोकरी इच्छुकांना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.
व्यवसाय – लॉकडाऊनची झालेली नुकसानी या नवीन वर्षात भरुन निघणार आहे. आपण या वर्षात पूर्णपणे व्यवसाय मोकळेपणाने करावेत. आपल्या अनुभवाने स्टॉक करुन त्याबाबत आपण अधिक लाभ मिळवू शकतात. हे वर्ष बसलेजागी फायदा मिळण्याचे राहणारे आहे. मुलांना आपल्या व्यवसायात आणण्याचे असल्यास हे वर्ष योग्यवेळेचे असणारे आहे.व्यापार, व्यवसाय मात्र कायद्याच्या कक्षेत राहुनच करावेत. कायद्याचे अडथळे येण्याचे योग आहेत. व्यापारकार्यात खुपच धावपळ करावी लागणार आहे.
विद्यार्थीवर्ग – विद्यार्थीवर्गाने या वर्षात वाहन चालवितांना सावधानपूर्वक वाहने चालवावीत. शालेय सहलीमध्ये अत्यंत सावधानता बाळगावी. कर्क राशी समस्त विद्यार्थीवर्गास हे वर्ष अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून देणारे असणार आहे. नवीन स्पर्धा परिक्षा या वर्षात देवू शकता. ग्रहांची साथ आपणास आहे. आपली साथपण अभ्यासाची असणार आहे. मेडिकल, सायन्स, बी.एस्सी., एम.एस्सी., वैद्यकीय, बी.फार्म, एम.फार्म, सिव्हिल इंजिनियर, इंटेरीयर डेकोरेटर, आर्किटेक्ट, पोलीस, सैनिक शिक्षण विद्यार्थीवर्गास उत्तम वर्ष आहे.
राजकारणी – जी राजकीय मंडळी नैष्टीक आहेत. आपण आपलेच पक्षात राहुन कार्य करीत आहात. आपण आपलेच पक्षातील निष्टावंत आहात व वर्तमान आपण राजकारणापासून दूर आहात अशा सर्वांना नवीन संपूर्ण वर्ष राजकारणात यश मिळवून देणारे आहेत. वरिष्ठपातळीवर आपले कार्याची दखल घेतली जाणार आहे. राजकारणी व्यक्तींनी या आलेल्या संधी सोडू नये. पक्षबदल करणार्या व्यक्तींना हे नवीन वर्ष त्रासदायक जाणार आहे. सर्वसाधारण माणसाकडून अपमानीत होण्याची शक्यता आहे. घरातीलच, जवळचीच नातेवाईक मंडळी निवडणुकात आपले विरोधात कार्य करणारे आहेत.
आरोग्य – नवीन वर्ष आपणास आरोग्यसंपन्न जाणारे आहे. असतील-नसतील असे आजार दूर पळणारे आहेत. जुनाट विकारापासून मात्र अधिक त्रास सोसावा लागणार आहे. पथ्य पाणीचे निर्बंध डॉक्टरांकडून लागणार आहेत. हे पथ्य गंभीरपणे पाळावे लागणार आहे. शक्यतोवर जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांची ऑपरेशन झालेली आहेत त्यांचे आरोग्यात सुधारणा होईल. ज्यांना ऑपरेशन सांगितलेली आहेत त्यांची आपरेशन सफल होणार आहेत. वाहन चालवितांना सावधानपूर्वक वाहन चालवावीत. घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची अत्यंत दक्षतापूर्वक काळजी घ्यावी लागणार आहे.
नातीगोती – नातेसंबंधाबाबत आपण मागील अनुभव असतांना आपलीच नातेवाईक आहेत म्हणून नातेसंबंध टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू यासंबंधीताबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. श्रीकृष्ण नितीप्रमाणे नातेवाईक तोडणेदेखील गरजेचे व हिताचे असते. याचा अनुभव आपणास घ्यावा लागणार आहे. घरात नातेवाईकांची वर्दळ राहणार आहे. रक्तादी संबधीत तसेच पत्नीचे नातेवाईकांसोबत तिर्थाटन आपण कराल. याच नातेवाईकांमुळे आपण अविवाहीत असाल किंवा मुला-मुलींचे विवाहाची इच्छा असलेस विवाह ठरतील.
आर्थिक – संपूर्ण संसारच आर्थिक एक बाजूवरच चालत असतो तर समस्त कर्क राशी व्यक्तींना येते नवीन वर्ष आपणास आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे असणार आहे. या वर्षात आपण दीर्घकाळासाठी बचतदेखील करु शकणार आहात. वाहन, जमीन, मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. घरात होणारे मंगल कार्याबाबतदेखील आपणास खर्च करावा लागणार आहे. नोकरवर्गात पगारवाढ, मजुरांना मजुरीत वाढ होणार आहे. या नवीन वर्षात मुलांचे शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवावयाचे असतील तर पाच-सहा आकडी रकमेचा खर्च करावयाचा आहे. उधारी, उसनवारी वसुल होईल.