Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले २४ करोना बाधित रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले २४ करोना बाधित रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ७६२

जळगाव  – 

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नव्याने 24 पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवसात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी जिल्हा प्रशासनास एकूण 120 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 24 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर 96 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले. पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये जळगाव ग्रामीण – 5, जळगाव शहर – 5, भुसावळ – 4, अमळनेर – 1, भडगाव – 5, यावल – 1, जामनेर – 1 तर रावेर येथील दोन जणांचा समावेश आहे.

- Advertisement -

सोमवारी रात्रीपर्यंत जळगाव जिल्ह्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 762 इतकी झाली आहे. दरम्यान, सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यात 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या अहवालातून पुुढे आली आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत जिल्हाभरात 81 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी सायंकाळी मात्र रुग्णांच्या मृत्युसंख्येत वाढ होऊन ती 94 इतकी झाली आहे.

पळून गेलेल्या डॉक्टरचा अहवाल पॉझीटीव्ह

शिरसोली येथे एक रुग्ण पॉझीटीव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यात एका डॉक्टरचाही समावेश होता. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या डॉक्टरचे स्वॅब नमूने घेण्यात आले होते. मात्र, अहवाल यायचा बाकी असतानाच हा डॉक्टर रुग्णालयातून पळून गेला होता. पळून गेलेल्या डॉक्टरचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने वैद्यकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या