Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनAnushka Sharma : "माझं भाग्य आहे की..."; विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर...

Anushka Sharma : “माझं भाग्य आहे की…”; विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास पोस्ट

मुंबई | Mumbai

काल विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांची मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर लढत झाली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल ७० धावांनी पराभव करत फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. त्यातील एक खेळाडू म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीने (Virat Kohli) वानखेडे स्टेडियमवर त्याच्या एकदिवसीय शतकांचे अर्धशतक पूर्ण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटच्या या कामगिरीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे…

- Advertisement -

NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या

विराटच्या विश्वविक्रमाचा फोटो शेअर करत अनुष्काने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे! मी देवाची खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं, तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच दैवी देणगी आहेस,” असे अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे.

Advay Hiray : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक

याचसोबत अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) देखील कौतुक केले आहे. मोहम्मद शमीचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा फोटो शेअर करत तिने टाळ्या वाजवणारे इमोजी पोस्ट केले आहेत. कालचा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना खूपच रंजक झाला. हा सामना पाहण्यासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जीएसटी आयुक्तपदी आशीष शर्मा

दरम्यान, भारताने ५० षटकांत ४ गडी गमावत न्यूझीलंडला ३९८ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडकडून मिचेल आणि विल्यमसन यांनी उत्तम खेळी केली, भारताला विकेटची सर्वाधिक गरज असताना शमीने दोन बळी घेतले आणि विजय खेचून आणला. या सामन्यात शमीने सात बळी घेतले. तर भारतीय फलंदाज व गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या फायनलमध्ये पोहोचला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Kartiki Ekadashi 2023 : आनंदाची बातमी! आजपासून विठ्ठल रखुमाईचे २४ तास दर्शन

- Advertisment -

ताज्या बातम्या