Saturday, October 3, 2026
Homeक्राईम‘अ‍ॅप’च्या फाईलवर क्लिक, एक लाख 80 हजार छुमंतर!

‘अ‍ॅप’च्या फाईलवर क्लिक, एक लाख 80 हजार छुमंतर!

तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कस्टमर सपोर्ट एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या पाच बँकांच्या के्रडिट कार्डवरून कोणताही ओटीपी न देता एक लाख 80 हजार 413 रुपये डेबिट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केशव निवृत्ती सानप (वय 30 रा. रभाजीनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सानप पाच वेगवेगळ्या बँकांचे के्रडिट कार्ड वापरतात. ते 10 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून कस्टमर सपोर्ट एपीके फाईल आली. त्यांनी ती फाईल पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले. क्लिक करताच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आले. त्यानंतर त्यांच्या एस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून तीन हजार दोन रुपये डेबिट झाले.

त्यानंतर त्यांच्या एचडीएफसी, एयु, आयसीआयसीआय, एसबीआय अशा बँक खात्याच्या क्रेडिट कार्डमधून टप्प्याटप्याने एकूण एक लाख 80 हजार 413 रूपये डेबिट झाल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर सानप यांनी बुधवारी (12 जून) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...