Friday, May 3, 2024
Homeनाशिकनवीन कृषीपंप वीज जोडणीचा लाभ घेण्याचे आवाहन

नवीन कृषीपंप वीज जोडणीचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

ऊर्जा विभागाच्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत परिमंडळात एकूण 2 हजार 873 कृषीपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या 2 हजार 534 जोडण्यांचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळात 1 लाख 53 हजार 620 शेतकर्‍यांनी कृषीपंप थकबाकीपोटी 119 कोटी रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला आहे.

- Advertisement -

लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून 30 मीटरच्या आत अंतर असलेल्या नाशिक मंडळामध्ये 505, मालेगाव मंडळामध्ये 255 आणि अहमदनगर मंडळामध्ये 1774 वीज जोडण्या अशा एकूण नाशिक परिमंडळामध्ये 2534 जोडण्या देण्यात आल्या आहेत.

नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर 20 मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून नाशिक मंडलात 19हजार 263 शेतकर्‍यांनी थकबाकीपोटी22 कोटी 36लाख रुपयांचा, मालेगाव मंडलात 23 हजार 75 शेतकर्‍यांनी थकबाकीपोटी 26 कोटी 36 लाख रुपयांचा आणि अहमदनगर मंडलात 1 लाख 10 हजार 930 शेतकर्‍यांनी थकबाकीपोटी 70 कोटी 7लाख रुपयांचा याप्रमाणे एकूण नाशिक परिमंडळात 1 लाख 53 हजार 268 शेतकर्‍यांनी कृषीपंप थकबाकीपोटी 119 कोटी रुपयांचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेचा लाभ परिमंडळातील शेतकर्‍यांनी घेण्याचे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

राज्यात 1 एप्रिल 2018 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 प्रत्यक्षात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या