Sunday, May 5, 2024
Homeजळगावनूतन अधीक्षक रुजू

नूतन अधीक्षक रुजू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कारागृहातील रक्षकास गावठी पिस्तूलने धमकावत सिनेस्टाइल पसार झालेल्या तीन कैद्यांचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. या कैद्यांच्या शोधासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यात पोलिसांचे सहा पथक रवाना झाले आहेत.

- Advertisement -

तर कारागृह अधीक्षकपदी उस्मानाबाद येथील गजानन पाटील यांनी रविवारी दुपारी पदभार स्वीकारला.कारागृहातील रक्षक पंडित दामू गुंडाळे (वय ४७) यांच्या डोक्याला शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पिस्तूल लावून त्यांना मारहाणही झाली.

त्यांच्या जवळील चाव्या हिसकावून स्वत: गेट उघडून सुशील अशोक मगरे (वय ३२, रा.पहूर कसबे, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (वय २१, रा.तांबेपुरा, अमळनेर) आणि सागर संजय पाटील (पैलाड, अमळनेर) यांनी कारागृहातून पलायन केले.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील जगदीश पुंडलिक पाटील (वय १८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) हा या तिघांना मोटारसायकलवर बसवून कारागृहापासून पसार झाला आहे.याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोपविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या