Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रडिसले गुरुजींची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करा

डिसले गुरुजींची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करा

नवी दिल्ली –

सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांची

- Advertisement -

विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस करावी अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

दरम्यान,युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार्‍या ग्लोबल टिचर पुरस्कारासाठी डिसले गुरुजी यांची निवड करण्यात आली. याबद्दल आज विधानपरिषदेत अभिनंदनाचा वर्षाव झाला सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत डिसले गुरुजींचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देताना दरेकर यांनी सांगितले की, रणजितसिंह डिसले यांच्या सन्मानाने राज्याचाच नव्हे, तर देशाचा गौरव वाढवला आहे. शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी त्यांनी केली आहे. डिसले गुरुजी यांचा गौरव करण्यासाठी आपण स्वत: बार्शिला जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटंबियांचे अभिनंदन केलं. डिसले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनमोल कामगिरीमुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला कामाची खरी पावती मिळाली आहे. यामुळे अन्य शिक्षकांच्या कामाला व कर्तृत्वाला नक्कीच उभारी येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या