Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 850 कर्मचार्‍यांची नियुक्ती

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 850 कर्मचार्‍यांची नियुक्ती

श्रीरामपुर (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 170 पथके तयार करण्यात आली

- Advertisement -

आहेत. त्यात 170 मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी 510 असे 850 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात 167 कर्मचारी राखीव आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 130 मतदान यंत्र असून प्रशिक्षणासाठी 11 असे 141 मतदान यंत्र श्रीरामपूरसाठी देण्यात आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.27 पैकी खानापूर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 26 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण दोन प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या प्रशिक्षणात निवडणूक मतदान पार पाडताना काय काळजी घ्यायची आहे, मतदान यंत्रात काही अडचण आल्यास काय उपाययोजना करावी,मतदान केंद्रात काय व कशी उपाययोजना करावी याबाबत सखोल माहिती देण्यात आली.

14 रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून या निवडणुकीत सुमारे 122 मतदान केंद्रांवर 40 हजार 42 स्रिया तर 42 हजार 977 पुरुष असे एकूण 83 हजार 19 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 130 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. 7 ग्रामपंचायतींसाठी 281 सदस्य संख्या आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी खानापूरच्या नऊ जागा, ब्राम्हणगाव वेताळ दोन तर निपाणी वाडगाव, वळदगाव, मालुंजा बुद्रुक प्रत्येकी एक अशा चौदा जागा बिनविरोध झाल्याने 267 जागांसाठी मतदान होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या