Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमाध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणीस मान्यता

माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणीस मान्यता

नाशिक । प्रतिनिधी

शाळांमधील पारंपारिक प्रयोगशाळा कालबाह्य झाल्या आहेत. यामुळे माध्यमिक शाळांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

यासाठी राज्यातील 961 शाळांना प्रत्येकी 6 लाख 40 हजार रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत या संगणक प्रयोगशाळांचे साहित्य खरेदी करण्याचे बंधन शाळांवर घालण्यात आले आहे.

या प्रयोगशाळांचे साहित्य दिलेल्या मुदतीत खरेदी करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिला आहे.

हे साहित्य जीईम पोर्टलवरून (गव्हर्नमेंट-ई-मार्केट प्लेस) खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 708 सरकारी उच्च प्राथमिक शाळांमध्ये तर, 1 हजार 500 माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळांची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे.

यापैकी पहिल्या टप्प्यात 961 शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या