Friday, May 17, 2024
Homeनाशिकअँटिजेन किट्स खरेदी प्रस्तावास मंजुरी

अँटिजेन किट्स खरेदी प्रस्तावास मंजुरी

नाशिक । प्रतिनिधी

आयसीएमआरने देशात करोनाची दुसरी लाट हिवाळ्यात अर्थात नोव्हेंबर महिन्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली असताना आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात नाशिक शहरातील करोना रुग्णांची संख्या लक्षणीय घटली आहे.

- Advertisement -

असे असताना महापालिका स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी शासनाच्या निर्देशानुसार दुसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून 2 कोटी 46 लाख रुपये किमतीच्या 50 हजार अँटिजेन किटस् खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

नाशिक शहरात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदिन एक हजारावर नवीन करोना रुग्ण समोर आले होते. हा आकडा 1300 पर्यंत जाऊन पोहोचला होता. यावेळी संशयितांच्या स्वॅब चाचण्या तातडीने करून करोना संसर्ग रोखण्याचे काम महापालिकेला करावे लागले होते. याकरता सर्वाधिक अशा 1 लाख 8,817 अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आता केंद्र व राज्य शासनाकडून नोव्हेंबर महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने महापालिका प्रशासनाने पुढची तयारी म्हणून आता 2 कोटी 46 लाख रुपये किमतीचे 50 हजार अँटिजेन किटस् खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास सोमवारी स्थायी समिती सभेत सभापती गिते यांनी मंजुरी दिली.

अँटिजेन किट परत देण्याच्या बोलीवर घ्या

महापालिका क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत 250 ते 300 अशा संख्येने प्रतिदिन नवीन करोना रुग्ण समोर येत आहेत. अचानक पंधरा दिवसांत रुग्णांचा आकडा 25 टक्क्यांवर आला असून यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे भविष्यात अशाच प्रकारे रुग्णांत घट झाल्यास अँटिजेन किट वापर कमी होणार आहे. परिणामी नव्याने येणार्‍या 50 हजार किटस्मधून किट शिल्लक राहिल्यास ते परत घेण्याच्या बोलीवर ती खरेदी केली जावेत, अशी मागणी पुढे आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या