Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा - मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावास वस्त्रोद्योग विभागाची मान्यता

नेवासा – मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावास वस्त्रोद्योग विभागाची मान्यता

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

नेवासा तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली असुन ऊसापाठोपाठ कापसाचे आगार असलेल्या नेवासा तालुक्यात मुळा सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून कापुस पिकावर आधारीत कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार कापुस उत्पादक जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात सुतगिरणीला परवानगी द्यायची त्या तालुक्यात वर्षाला किमान 9600 टन कापसाचे उत्पादन आवश्यक असते. नेवासा तालुक्यात दरवर्षी 17 हजार ते 21 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होत असुन 12 हजार ते 22 हजार टनापर्यंत कापसाचे उत्पादन होत असते. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन 15 दिवसापुर्वी नेवासा तालुक्याचा समावेश कापुस उत्पादक तालुक्याच्या यादीत करुन घेतला असुन आता सतगिरणीच्या प्रस्तावालाही वस्त्रोद्योग विभागाची मान्यता मिळाली आहे. नागपुर येथील महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती माधवी खोडे-चावरे यांनी मुळा सहकारी सुतगिरणी या नवीन संस्थेला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत संस्थेचे खाते उघडण्यास परवानगी दिली असुन सभासदांकडून भाग भांडवल गोळा करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.

नेवासा तालुक्यात दरवर्षी ऊसाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. दरवर्षी 50 ते 60 कोटीची ऊलाढाल होत असते. ऊस पिकावर प्रक्रिया करुन साखर निर्मिती करणारे कारखाने तालुक्यात सुरु झाले, पण आता सुतगिरणीच्या माध्यमातून आणखी एक कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन त्यामुळे तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळू शकेल. कारण वस्त्रोद्योगात सुत निर्मिती, कापड निर्मिती, कापड प्रक्रिया, रेडीमेड गारमेंट व होजिअरी इत्यादी अनेक उद्योगांचा समावेश असतो. कापसावर प्रक्रिया करुन वेगवेगळ्या प्रकारचे कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुताची निर्मिती नियोजित सुतगिरणीमध्ये होणार असुन हा प्रकल्प नेवासा तालुक्यातील वस्त्रोद्योगाची नांदी ठरणार आहे. तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकरी व विविध संस्थांना या प्रकल्पाचे सभासद होता येणार असुन भाग भांडवलाच्या निकषात बसल्यानंतर राज्य शासनाकडून सुद्धा शासकीय भाग भांडवलाच्या माध्यमातूनही अर्थसहाय्य मिळणार असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले. सुतगिरणीची क्षमता 25200 चात्यांची असुन प्रकल्प सुरु झाल्यावर तालुक्यातील तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मुळा कारखान्याच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षात तालुक्यात जे आर्थिक परीवर्तन झाले त्यात नियोजित सुतगिरणीच्या प्रकल्पाने आणखी भर पडेल अशी अपेक्षाही नामदार गडाख यांनी व्यक्त करुन जास्तीत जास्त शेतकरी व संस्थांनी या प्रकल्पासाठी आपला आर्थिक सहभाग द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या