Sunday, May 5, 2024
Homeनगरकलेक्टरांचा दणका; पाचही नावे स्वीकृत नगरसेवकासाठी अपात्र

कलेक्टरांचा दणका; पाचही नावे स्वीकृत नगरसेवकासाठी अपात्र

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वीकृत सदस्य निवडीसाठी गटनेत्यांनी शिफारस केलेली पाचही नावे अपात्र असल्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी आज घेतला. तशी शिफारस महासभेला केल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. महासभेत त्यावर खल सुरू आहे.

महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवडीसाठी आज शुक्रवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा सुरू झाली. कालच गटनेत्यांनी बंद पाकिटात स्वीकृत सदस्यांची नावे प्रशासनाला दिली होती.

- Advertisement -

आज प्रशासनाने त्याची छाननी केली. राष्टवादीकडून बाबासाहेब गाडळकर, विपुल शेटिया, भाजपकडून रामदास आंधळे आणि शिवसेनेचे संग्राम शेळके, मदन आढाव यांची नावे दिली गेली.

नव्याने नियुक्त केल्या जाणार्‍या स्वीकृत सदस्यांचे सामाजिक कार्य, ते ज्या संस्थेत कार्यरत होते त्या संस्थेची घटना आणि कार्यकक्षेची माहिती दिलेली नाही, त्याचे पुरावेही दिले नाहीत, असे स्पष्ट करत प्रशासनाने महासभेला पाचही नावे अपात्र असल्याची शिफारस केली आहे.

कलेक्टरांच्या या निर्णयाने नगरच्या राजकारणात भूपंक झाला आहे. स्वीकृत सदस्य निवडीसाठी ‘कोट्यवधी’च्या बोलाचाली झाली. त्यामुळे कलेक्टरांच्या निर्णयाने राजकीय भूकंप झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या