Friday, May 3, 2024
Homeनगरआरडगाव सोसायटीत जनसेवा मंडळाचे वर्चस्व

आरडगाव सोसायटीत जनसेवा मंडळाचे वर्चस्व

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील आरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व 13 जागांवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळविला. ग्रामविकास मंडळ व परिवर्तन जनसेवा मंडळाचा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडविला.

- Advertisement -

आरडगाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळ, परिवर्तन जनसेवा मंडळ आणि ग्रामविकास मंडळ अशी अटीतटीची तिरंगी लढत झाली. यामधे जनसेवा मंडळाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. यामध्ये विरोधकांना भोपळा देखील फोडता आला नाही. तर डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रवींद्र म्हसे यांना देखील धक्कादायक पराभवाला सामेारे जावे लागले.

जालिंदर काळे (332), नाथा झुगे (314), राहुल झुगे (340), सुनील झुगे (313), अंकुश देशमुख (304), शैलेंद्र म्हसे (255), अर्जुन वने (265), बाबासाहेब शेळके (287), प्रमिला बाळासाहेब झुगे (290), शोभा चंद्रभान झुगे (319), लक्ष्मण जाधव (348), सुनील मोरे (345), कृष्णनाथ भांड (324) हे सर्वच तेरा उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी.टी महाजन यांनी घोषित केले. त्यांना संस्थेचे सचिव शाम तनपुरे यांनी सहकार्य केले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या