Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअर्चनाताई कोते यांचा शिर्डीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा

अर्चनाताई कोते यांचा शिर्डीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीच्या विद्यमान नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा गुरुवार दि. 19 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपूर्द केला

- Advertisement -

असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. आता उर्वरित दहा महिन्यांसाठी नगराध्यपदाची कोणाला संधी मिळते याकडे शिर्डी ग्रामस्थ तसेच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील नगराध्यक्ष साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळात पदसिद्ध सदस्य असतो. विद्यमान नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी मागील वर्षी जून महिन्यात नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.

मात्र त्यांना लॉकडाऊनमध्ये वाढीव कालावधी मिळाला आहे. याबाबत त्यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. परंतु त्यांच्या राजीनाम्याची खबर विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिपावलीच्या अगोदरच नवीन नगराध्यक्ष निवडीबद्दल वक्तव्य केले होते. त्यानुसार या अल्पशा दहा महिन्यांसाठी का होईना इच्छुकांनी दबावतंत्राचा वापर केला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी संधी देऊ म्हणून घेतलेल्या शब्दाची पुर्ती होते की नवीन चेहर्‍यांंना संधी मिळते हे आता स्पष्ट होणार आहे. दरम्यान विद्यमान नगराध्यक्षांचा राजीनामा घेतल्याची चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे.

शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद हे राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानसाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने दहा महिने का होईल नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान कोणाला मिळतो याची शिर्डीकरांना आतुरता लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या