Friday, May 3, 2024
Homeजळगावकलाशिक्षक शाम कुमावत यांना ‘राष्ट्रीय कालीदास पुरस्कार’ जाहीर

कलाशिक्षक शाम कुमावत यांना ‘राष्ट्रीय कालीदास पुरस्कार’ जाहीर

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर Nashirabad

उज्जैन येथील कालीदास अकादमी (मध्यप्रदेश संस्कृती परिषद) तर्फे दरवर्षी कालीदास समारोहचे आयोजन करण्यात येते. यात महाकवी कालीदास रचित काव्यांवर आधारीत ग्रंथांवर चित्रांकण केले जाते. यावर्षी ‘ऋतुसंहार’ या काव्यावर आधारीत श्लोकांवर चित्रांकण करायचे होते. यात नशिराबाद न्यू इंग्लिश स्कुलचे कलाशिक्षक शाम पुंडलीक कुमावत यांनी ‘ग्रीष्मवर्णनम्’ यात दिवस व रात्र यातील होणारे बदल या चित्रामध्ये चित्रांकण केलेले आहे.

- Advertisement -

तप्त सुर्याच्या किरणांनी त्रस्त वन्य प्राणी तसेच रात्रीच्या चंद्रप्रकाशात येणारा उत्साह, शृंगार त्यांनी रेखाटलेल्या चित्रात चित्रांकीत आहे. या चित्रांकणास ‘राष्ट्रीय कालीदास पुरस्कार’ जाहीर झाला असून या पुरस्कारात रू. एक लाख व सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. शाम कुमावत यांना 2012 मध्ये ‘रघुवंशम’ या चित्रांकनासही ‘कालीदास पुरस्कार’ पुरस्कार मिळाला आहे. शाम कुमावत यांना जाहिर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या