Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्या"… तर उद्धव ठाकरेंसह अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल"; अरविंद केजरीवालांचा...

“… तर उद्धव ठाकरेंसह अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल”; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

कथित मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात अनेक दिवस काढल्यानंतर काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजुर करत मोठा दिलासा दिला. त्यानंतर आज केजरीवाल लोकसभेच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी आणि भाजपवर (BJP) टीका करतांना देशात पुन्हा भाजपचे सरकार आले तर देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशात पुन्हा भाजपचे सरकार आले तर उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, स्टॅलिन, ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील प्रमुख विरोधीपक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल. त्याचप्रमाणे भाजपला एक एक करून सर्वांना संपवायचे आहे. मात्र, मी या हुकूमशाहीशी लढणार असून देशवासियांना विनवणी करतो की तुम्ही देशाला वाचवा. पंतप्रधान मोदींना (PM Modi) देशावर हुकूमशाही लादायची आहे,असे झाल्यास राज्यघटना रद्द होईल. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी आता केंद्र सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

हे देखील वाचा : “गेल्या दहा वर्षांत त्यांनी…”; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पुढे बोलतांना केजरीवाल म्हणाले की, “निवडणुकीच्या (Election) काळात मी तुरुंगातून (Jail) बाहेर येईल, असे वाटले नव्हते. मात्र, हनुमानजींच्या कृपेमुळेच मी तुमच्यामध्ये आलो आहे, हा एक चमत्कार घडला आहे. पुढील वर्षी १७ सप्टेंबरला मोदी रिटायर्ड होणार आहेत. तसेच लोकसभेची ही निवडणूक जिंकली तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पदावरून हटविले जाईल. जर योगी यांना हटविले नाही तर ते मोदींनंतर पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असू शकतात. त्यामुळे देशाचे पुढचे पंतप्रधान अमित शाह (Amit Shah) यांना बनवले जाईल. यामुळे मोदी त्यांच्यासाठी नव्हे तर अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मत मागत आहेत. त्यामुळे देशात ‘वन नेशन, वन लीडर’ मिशन सुरु करण्याचा भाजपचा डाव असून देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नरहरी झिरवाळांनी अखेर ‘त्या’ फोटोबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाले,”मी शरद पवार गटासोबत…”

तसेच ४ जूननंतर देशात भाजपचे सरकार बनत नाही. याशिवाय एकाही राज्यात त्यांच्या जागा वाढणार नाहीत. त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार केंद्रात येईल. आमचे सरकार आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार आहे. दिवसात २४ तास असतात त्यामुळे मी पुढचे २१ दिवस ३६ तास काम करून दाखवणार आहे. कुठलही सरकार लोकशाहीला तुरुंगात बंद करू शकत नाहीत. त्यामुळे मी तुरुंगातून देखील लोकशाही (Democracy) चालवून दाखवेल असं देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या