Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन‘अशी ही बनवाबनवी’ला ३३ वर्ष पूर्ण; जाणून घ्या या सिनेमाबद्दलच्या काही भन्नाट...

‘अशी ही बनवाबनवी’ला ३३ वर्ष पूर्ण; जाणून घ्या या सिनेमाबद्दलच्या काही भन्नाट गोष्टी

काळाच्या ओघात अनेक गोष्टी, माणंस बदलतात हे कितीही खरं असलं तरीही याला काही अपवादही आहेत. या अपवादांपैकीच एक म्हणजे काही कलाकृती. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादानं संपन्न अशाच कलाकृतींपैकी एक असणाऱ्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला तब्बल ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हा चित्रपट अजूनही त्या काळात घेऊन जातो. जगावेगळे उदात्त सोशिक नायक-नायिका नाहीत, उगाचच तत्वज्ञान सांगणारे जड संवाद नाहीत, ४ तरुणांची घरासाठीची धडपड दाखवणारी साधीसुधी कलाकृती. ३ रुपयांच्या तिकिटावर ३ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या ‘पिच्चर’ला ३३ वर्षे होऊन गेली तरी माधुरी-धनंजय, शंतनू-सुषमा, कमळी-परशा या जोड्या आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. सरपोतदारांसारखें घरमालक अजूनही पुण्यात आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला त्याकाळात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

- Advertisement -

पण तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट ओरिजनल नसून एका चित्रपटाचा रिमेक आहे. तुम्हाला ही गोष्ट वाचल्यानंतर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट एका बॉलिवूड चित्रपटावरून बनवण्यात आला आहे. खूप जणांना माहित नसेल पण हा हृषीकेश मुकर्जी यांच्या १९६६ च्या ‘बीवी और मकान’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे. त्यात धनंजय मानेच्या भूमिकेत मेहमूद होते. पण सचिनने बनवा-बनवीच दिग्दर्शन करताना त्यात एक मराठीपण जपलयं.

ह्या चित्रपटात वाह्यात आणि अश्लील विनोद करण्याचा खूप वाव होता. पण एकाही दृश्यात तसं केलेलं नाही. म्हणूनच हा चित्रपट कितीही वेळा पहिला तरी कंटाळा येत नाही. पार्वती थोडी आगाऊ आहे पण तिचे ‘धनी’ वेळोवेळी तिला आवर घालतात. सुधा सुद्धा खूप धोरणी आहे. स्वतःच्याच नवऱ्याच्या लफड्यात तिला स्वतःलाच कर्करोगी बनावं लागत. माने साहेबांना सुद्धा मालकीणबाई आवडतात पण तिथं पण ‘दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके’. एकंदरीत सगळीच बनवा-बनवी एकदम फर्स्ट क्लास!

या चित्रपटाची पटकथा तितकीशी भक्कम नाही. सुधीर आल्यादिवशीच सरपोतदारांना भेटला होता वर त्यांचाच तोंडावर त्यांना माळीबुवा म्हणाला होता मग जेव्हा तो शंतनूसोबत अभ्यास करत असताना सरपोतदार आले तेव्हा त्यांनी त्याला कसं ओळखल नाही? किंवा शंतनू स्वतः डॉक्टर असताना त्याने स्वतःच्या बायकोच्या फक्त तपासणीसाठी बाहेरून (तोतया) डॉक्टर कमळी का बोलावली? असे प्रश्न सुद्धा पडतात. पण ह्या चित्रपटाचे एक-एक सीनच एवढे धमाल आहेत कि या गोष्टी लक्षातच येत नाहीत.

या चित्रपटा सारखे कडक डायलॉग्ज आणि अप्रतिम टाईमिंग परत कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाले नाहीत. आज त्यातले काही कलाकार हयात नाहीत पण सुधीर जोशींचा विश्वास सरपोतदार आणि लक्ष्याची पार्वती कायम जिवंत राहतील.

आजही हे डायलॉग प्रेक्षकांना खळखळून हसवतात

१) धनंजय माने इथेच राहतात का?

२) सरपोतदार : बरे झाले आठवण झाली, मी तुम्हाला औषधासाठी दिलेले सत्तर रुपये परत करा.

माने: मी तुम्हाला म्हंटल होता ना, तो इस्राईल चा माझा मित्र, तो परवाच एका अपघातात वारला हो… तुम्ही दिलेले रुपये पण वारले.

सरपोतदार : हा हालकटपणा आहे माने !

३) आमच्या शेजारी राहते, नवऱ्यानं टाकलंय तिला

४) सारखं सारखं एकाच झाडावर काय?

५) अजून बारका नाही मिळाला का ( शंतनू स्टूल आणतो तेव्हा)

६) आणि हा माझा बायको…

७) झुरळ… तशी आपल्या ऑफिसमध्ये झुरळं जरा कमीच आहेत.

८) जोडा खूप चांगला आहे, तोंडावर मारण्यासारखा

- Advertisment -

ताज्या बातम्या