Thursday, May 2, 2024
Homeनगरअशोक चव्हाण म्हणाले, राजकीय वॉरला गॅंग वॉर होऊ देऊ नका...

अशोक चव्हाण म्हणाले, राजकीय वॉरला गॅंग वॉर होऊ देऊ नका…

शिर्डी | शहर प्रतिनिधी

सार्वजनिक जीवनात जे काही वातावरण दुषित करण्यात आले आहे ते महाराष्ट्राच्या आणी देशाच्या हिताचे नाही. असे माझे व्यक्तिगत मत आहे. आरोप झाल्यावर प्रत्यारोप होतातच मग त्यातूनच फारसे काही निष्पन्न होत नाही….

- Advertisement -

सामान्य माणसाला या गोष्टीत स्वारस्य नाही. लोकांच्या गरजा, महागाईचा प्रश्न महाराष्ट्रात आणी देशात मोठा आहे. लोकांच्या हिताची कामे झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. परंतु ज्या पध्दतीने राजकीय वातावरण सातत्याने गढुळ करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे ते निश्चितच योग्य नसून हा पाँलीटिकल वाँर गँगवाँर होऊ देऊ नका अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिर्डीत (SHirdi) व्यक्त केली.

दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवार दि.२९ रोजी मध्यान्ह आरतीला साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ना.चव्हाण यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी श्री साईसंस्थानच्या वतीने साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते ना.अशोक चव्हाण यांचा साईबाबांची मुर्ती शाल देऊन सत्कार करण्यात आला.

‘श्रुती हसन’चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

यावेळी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, अविनाश दंडवते, अँड सुहास आहेर,आ.डॉ सुधीर तांबे, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक कोते तसेच नगरसेवक सचिन चौगुले, स्वराज त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, निलेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते. तर काँग्रेसच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना.चव्हाण यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी बोलतांना सांगितले की, साधारण पावणे दोन वर्षांनंतर मी शिर्डीला आलो आहे. मध्यंतरी कोव्हीडमुळे काही बंधने होती. लाँकडाऊनमुळे जवळपास दर्शन बंद होते. त्यामुळे शिर्डीत येणे झाले नाही, नाहीतर दरवर्षी शिर्डीला येण्याचा माझा प्रयत्न असतो. सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे आणी दर्शन सुरू झाल्याने बाबांच्या दर्शना साठी आलेलो आहे. बाबांचा मी भक्त आहे. त्यामुळे मी इथे असो किंवा नसो मी दर्शनाला कायम येत असतो. महाराष्ट्राचा विकास गतीने होऊन सगळी विघ्न दूर झाली पाहिजेत. मध्यंतरीच्या काळात झालेली अतिवृष्टी, नुकसान यातून महाराष्ट्राने बाहेर पडून कोव्हिडसारख्या महाभयंकर अडचणीतून मात आपण केलेली आहे. महाराष्ट्र सदैव सुखरूप राहावा आणि महाराष्ट्रातल्या लोकांना उदंड आयुष्य मिळावे, रोगराईपासून महाराष्ट्र तसेच देश मुक्त व्हावा अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात हा गैरसमज निर्माण करून दिला जात आहे, मला वाटतं की ही सगळी प्रक्रिया पहिल्या पेक्षा ब-याच वेगाने सुरू आहे. मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. यामध्ये प्रशासकीय विभागामध्ये, काही भाग हा महसूल विभागाकडे, काही उच्च शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातील या मागण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. विरोध करण्याची पद्धत योग्य रितीने राहिली पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन ज्या पध्दतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतायत आणी एकमेकांच्या घरापर्यंत जाण्याचा सुरू झालेला हा प्रवास निश्चितच अशोभनीय आहे.

राजद्रोहाचा गुन्ह्याबाबत बोलतांना म्हणाले की, कायद्यामध्ये असलेल्या ब-याचशा तरतुदींंचा दुरुपयोग केला जातो. त्याचा राजकीय दृष्टीने अनेकदा वापर होतोय हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. हे जे अस्र, कायदे आहे याचा गुन्हेगारांवर वापर होणे हे समजू शकतो, मात्र राजकीय विरोधकांच्या विरोधामध्ये अशाप्रकारचा वापर होणे निश्चितच योग्य नसून लोकशाहीला मारक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

- Advertisment -

ताज्या बातम्या