नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
सिडको येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक वसंतराव जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर समाज बांधवांनी त्यांचे कौतुक केले.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना जगताप यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तन-मन-धनाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कृपेने समाज एकजुटीने पुढे जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजसेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.





