Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरुद्राक्षावर साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र; चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचा नवा विश्वविक्रम

रुद्राक्षावर साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र; चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचा नवा विश्वविक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सूक्ष्म कलेच्या माध्यमातून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील राहिवाशी सुप्रसिद्ध सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या कलेचा अनोखा ठसा उमटवला आहे.दि.19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ऐश्वर्या यांनी अतिशय सूक्ष्म अशा रुद्राक्षावर शिवरायांचे आकर्षक चित्र साकारत एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

अत्यंत सूक्ष्म अशा रुद्राक्षावर कोणत्याही प्रकारच्या दुर्बिणीचा किंवा भिंगाचा वापर न करता इतके बारकाईने चित्र साकारणे हे मोठे कौशल्य मानले जाते. ऐश्वर्या औसरकर यांची हीच वैशिष्ट्यपूर्ण कला त्यांना इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते. विशेष म्हणजे, त्या कोणत्याही सहाय्यक साधनांशिवाय सूक्ष्म चित्रकलेत प्रावीण्य मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या कलाकारांपैकी एक मानल्या जातात.

त्यांच्या या अप्रतिम कलेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नेते अजित पवार यांची सूक्ष्म चित्रे शेंगदाण्यावर साकारून त्यांचे सूक्ष्म चित्र भेट दिले आहे. या कलेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या कलेचे नाशिकमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले होते.

सूक्ष्म कलेच्या माध्यमातून समाजात प्रेरणा निर्माण करणाऱ्या ऐश्वर्या औसरकर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे रुद्राक्षावरील चित्र साकारत आपल्या कलेला एक वेगळा आयाम दिला आहे. त्यांच्या या कलाकृती मुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे तोंडभरून कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे नाशिक शहराचा मानही उंचावला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...