Friday, June 19, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : दुहेरी नफ्याचे आमिष महागात! पाच जणांना दाेन कोटींना...

Nashik Fraud Crime : दुहेरी नफ्याचे आमिष महागात! पाच जणांना दाेन कोटींना गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून (Online Share Treading) अल्पावधीत दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी शहरातील एका महिलेसह पाच जणांकडून तब्बल २ कोटी १६ लाख ४ हजार ७५० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावरील (Socail Media) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि आकर्षक ‘रिटर्न’चे स्क्रीनशॉट दाखवत ही फसवणूक करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

- Advertisement -

१५ नोव्हेंबर २०२५ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादींना अज्ञात अनाेळखी संशयितांनी (Suspected) विविध परदेशी व भारतीय मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला. स्वतःला ‘शेअर मार्केट तज्ज्ञ’ आणि ‘ब्रोकिंग कंपनीचे प्रतिनिधी’ असल्याचे भासवून आरोपींनी ऑनलाइन ट्रेडिंग अ‍ॅपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. प्रारंभी कमी रकमेवर जास्त परतावा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगितले.

गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे बनावट आकडे अ‍ॅपवर दाखवण्यात आले; मात्र पैसे (Money) काढण्याचा प्रयत्न करताच ‘टॅक्स’, ‘प्रोसेसिंग फी’ आदी कारणांनी आणखी रक्कम भरण्याचा दबाव टाकण्यात आला. अखेरीस संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या गुन्ह्यातील रक्कम विविध ‘म्यूल अकाउंट्स’मधून फिरवण्यात आल्याचा संशय असून या बँक खात्यांचा तपास सुरू आहे.

तर, सायबर पाेलिस (Cyber Police) मोबाईल क्रमांक, आयपी अ‍ॅड्रेस व आर्थिक व्यवहारांचा तपास करत असून अल्पावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, अधिकृत नोंदणीकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचीच निवड करावी आणि संशयास्पद व्यवहार तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर कळवावेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत. 

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्‍या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या...