Thursday, July 23, 2026
Homeमहाराष्ट्रAshok Kharat Case: एक कोटी दहा लाखांचं सोनं, चांदी, अमेरिकन डॉलर्स…; खरातच्या...

Ashok Kharat Case: एक कोटी दहा लाखांचं सोनं, चांदी, अमेरिकन डॉलर्स…; खरातच्या बँकेतील लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड

नाशिक | प्रतिनिधी
आध्यात्मिक शक्तीचा धाक दाखवून सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरातच्या आर्थिक साम्राज्यावर घाला घातला असून, गुरुवारी नाशिकच्या एका बँकेतील लॉकर उघडले असता त्यात सोन्या-चांदीसह परकीय चलनाचे घबाड हाती लागले आहे. ६० बेनामी खाती, ७० कोटींची उलाढाल आणि ८० हून अधिक मालमत्तांच्या कागदपत्रांमुळे खरातचे हे जाळे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई नाका परिसरातील एका बँकेत खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्या नावावर असलेल्या लॉकरची ईडीने झडती घेतली. यात सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचे सोने, १ लाख ८९ हजारांची चांदी आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ५ लाख १७ हजार रुपये) रोख आढळले आहेत. हा परकीय चलनाचा साठा खरातकडे कसा आला? याचा तपास आता ईडी करत आहे.

- Advertisement -

Maharashtra SSC Board Result 2026: मोठी बातमी! दहावी परिक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी, कोणता विभाग ठरला अव्वल?

६० बेनामी खाती अन् ७० कोटींची उलाढाल
खरातने आर्थिक फसवणुकीसाठी एक भयंकर मोडस ऑपरेंडी वापरली होती. त्याने भक्तांच्या नावावर ६० बेनामी खाती उघडली होती. धक्कादायक म्हणजे, या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक होता आणि तो स्वतः सर्व खात्यांवर नॉमिनी होता. या खात्यांमधून आतापर्यंत ७० कोटींहून अधिक रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचे समोर आले असून सर्व व्यवहार खरातच्या नियंत्रणात होते.

मर्सिडीज, ८० मालमत्ता
खरातकडे केवळ रोकडच नाही, तर ८० लाखांची मर्सिडीज बेंझ आणि सुमारे ८० ते ९० मालमत्तांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. दैवी शक्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणे आणि त्यातून मालमत्ता उभी करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. विशेष म्हणजे, या काळ्या धंद्यात नाशिकमधील काही बड़े राजकीय आणि सफेदपोश लोकही सामील असल्याचा संशय आहे. ईडीचा तपास आता त्या बड्या माशांच्या दिशेने वळला असून लवकरच नाशिकमधील काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील...

0
नाशिक | Nashik नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या सततच्या सरींमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड...