Thursday, November 5, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

Soybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 7000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची (Soybean) 25 क्विंटलची आवक होवून किमान 6700 रुपये, जास्तीत जास्त 7000 रुपये तर सरासरी 6850 रुपये भाव मिळाला. गव्हाची 1 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 3000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 1299 क्रेट्सची आवक झाली. त्यास नंबर 1 ला 131 ते 175 रुपये, नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये, नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. सीताफळाच्या (Custard Apple) 15 क्रेट्सची आवक झाली. त्याला 45 ते 75 रुपये तर सरासरी 55 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

0
पुणे | प्रतिनिधी Pune थायलंडमधून पुण्यात आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी ३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा १० किलो ६४२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा...