Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Case : नामकर्ण आवारे यांचा जामीन अर्ज फेटाळला

Ashok Kharat Case : नामकर्ण आवारे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या नामकर्ण आवारे यांचा जामीन अर्ज सिन्नर न्यायालयाने आज (दि. ३०) फेटाळून लावला.

कॅप्टन भोंदू खरातने जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडून त्यावर केलेल्या आर्थिक उलाढालीवर आवारे यांना दोन टक्के देत होतो असा आरोप पोलीस तपासात केला होता. त्यावर सिन्नर पोलिसांनी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नामकर्ण आवारी यांना अटक केली होती. न्यायालयाची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळताच आवारे यांनी जामीनासाठी रीतसर अर्ज केला होता. त्यावर दोन दिवसांपूर्वीच दोन्ही बाजूचा युक्तिवादही झाला होता. त्यानंतर न्यायालयाने निकालासाठी आजची तारीख ठेवलेली होती. आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान न्या. एल. सी. वाडीकर यांनी आवारे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचा निकाल दिला. त्यामुळे आवारे यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

आता त्यांना नाशिकच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. जवळपास दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांच्या जामिनावर अजून नाशिकच्या सत्र न्यायालयात सुनावणी झालेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आवारे यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामीनासाठी केव्हा अर्ज दाखल होतो व त्यावर युक्तीवादासाठी न्यायालय कोणती तारीख देते याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : महागाई, मतदार याद्यांतील घोळ आणि दुष्काळावरून रोहित पवारांचा सरकारवर...

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली....