Saturday, October 24, 2026
HomeनगरAhilyanagar : खरातला न्यायालयीन कोठडी; शिर्डीतील गुन्ह्यात आज पुन्हा पोलीस कोठडीची मागणीची...

Ahilyanagar : खरातला न्यायालयीन कोठडी; शिर्डीतील गुन्ह्यात आज पुन्हा पोलीस कोठडीची मागणीची शक्यता

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत काल संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.

- Advertisement -

न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या 14 दिवसांपासून विशेष तपास पथक या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. काल न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांतही एसआयटीने खरातची कसून चौकशी केली. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. बापाच्या या काळ्या कारनाम्यात मुलाचा नेमका सहभाग किती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी अशोक खरातचा मुक्काम कारागृहात जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसर्‍या एका गुन्ह्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी दोघेही आरोपी आहेत. या दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस त्याला आज पुन्हा अटक दाखवून न्यायालयासमोर हजर करणार आहेत. त्यामुळे आज पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच ती फरार झाली असून पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.

अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार
अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवून महिलांना देवाचा कोप होण्याची भीती घालत असे. या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. एसआयटीकडून खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या संपत्तीचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत अशोक खरातला दोन टप्प्यांत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील 18 ते 24 मार्च या पहिल्या टप्प्यात त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तर 25 ते 29 मार्च या दुसर्‍या टप्प्यात एसआयटीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली. या काळात पोलिसांनी खरातच्या आश्रमातून आणि निवासस्थानातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. त्यामुळे अशोक खरातप्रकरणी अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​अस्थमा बरा करण्याचे आमिष; लाखो उकळणाऱ्या संशयिताची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अस्थमा (दमा) पूर्णपणे बरा करण्याचे आणि घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित...